राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण
महाराष्ट्र राज्य, पुणे
कार्ये
रासनिप्रा ची कार्ये :-
राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका पार पाडणे. तसेच त्यासाठीच्या आणि मतदार यादीचे अधिक्षण, निर्देशन आणि नियंत्रण करणे.
राज्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूका घेणे आणि त्यासाठीच्या मतदार यादीचे अधिक्षण, निर्देशन आणि नियंत्रण करणे.
विहीत प्रक्रिया, मार्गदर्शक तत्वे आणि पद्धत यास अनुसरुन सहकारी संस्थेची किंवा संस्थेच्या वर्गांची निवडणूक घेण्यासाठी विहीत केलेले नवीनतम तंत्रज्ञान आणि कौशल्य यांचा उपयोग करणे.
संचालक मंडळाची निवडणूक घेणे आणि संस्थेच्या सर्वसाधारण निवडणूकीनंतर समितीच्या गठणानंतर आवश्यकतेप्रमाणे उपविधीतील तरतुदीनुसार 15 दिवसांच्या आत अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष आणि पदाधिकारी यांची निवडणूक घेणे.
संबंधित जिल्हा / तालुका / प्रभागातील सहकारी संस्थांच्या निवडणूका घेण्यासाठी जिल्हा / तालुका / प्रभाग सहकारी निवडणूक अधिकारी यांची नियुक्ती करणे. तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका घेण्यासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी यांची नियुक्ती करणे.
सहकारी संस्थेच्या /कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीकरीता निवडणूक निर्णय अधिकारी / सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी / क्षेत्रिय अधिकारी / निरीक्षक यांची नियुक्ती करणे.
निवडणूक घेण्यात येणाऱ्या सहकारी संस्थेच्या/ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक कार्यक्रमास मंजूरी देणे.