Government of India

वापरसुलभता

कोणत्याही उपकरणांचा किंवा तंत्रज्ञानाचा वापर करून, सर्व प्रकारच्या वापरकर्त्यांना 'राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण'चे संकेतस्थळ पाहता आणि वापरता यावे, यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. या संकेतस्थळाला भेट देणाऱ्या सर्व व्यक्तींना संपूर्ण मजकूर पाहता यावा आणि त्यापासून शक्य ते लाभ घेता यावेत, या उद्देशाने हे संकेतस्थळ विकसित करण्यात आले आहे. त्यामुळे वेब सक्रीय मोबाईल, डब्ल्यू ए पी फोन, पीडीए आणि इतर विविध प्रकारच्या उपकरणांमध्ये हे संकेतस्थळ पाहता येईल.

दिव्यांग व्यक्तींनाही या संकेतस्थळावरील माहितीचा लाभ घेता यावा, यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत. उदा. स्क्रीन रीडर आणि भिंग अशा सहाय्यक पर्यायांचा वापर करून दृष्टीहीन व्यक्तींनाही या संकेतस्थळावरील माहितीचा लाभ घेता येईल.

या संकेतस्थळाला भेट देणाऱ्यांना सोईस्कर वाटेल, अशा प्रकारे या संकेतस्थळाचे विकसन करत असतानाच मानकांचे पालन करणे तसेच वापर सुलभता आणि रचनेसंबंधीच्या सर्वसामान्य तत्त्वांचे पालन करणे, हे सुद्धा आमचे ध्येय आहे. या संकेतस्थळाच्या वापर-सुलभतेसंदर्भात तुमच्या काही सूचना असतील किंवा काही समस्या असतील तर कृपया आमच्याशी संपर्क साधा.

सुगमता वैशिष्ट्येः

मुख्य विषयाकडे जाण्यासाठी कळफलकाचा वारंवार वापर न करता थेट मजकुराकडे जाण्याची तरतूद.

 • मुख्य पानावर जाण्यासाठी : संकेतस्थळाच्या कोणत्याही पानावरून त्वरीत मुख्य पृष्ठावर पोहोचण्याची तरतूद.
 • सुगमता पर्याय : उपलब्ध पर्यायांचा वापर करून मजकुराचा आकार बदलण्याची आणि तसेच रंगसंगती बदलण्याची तरतूद. उदा. तुम्ही डेस्कटॉपवरून हे संकेतस्थळ पाहू लागलात तर मजकूराचा आकार जरा लहान दिसू शकेल. लहान आकारातील मजकूर वाचणे गैरसोयीचे ठरू शकेल. अशा वेळी तुमच्या दृष्टीला सोईस्कर असा मजकुराचा आकार तुम्ही निवडू शकता.
 • वर्णनात्मक दुव्यांचा मजकूर : अधिक तपशिलासाठी आवश्यकतेनुसार "अधिक वाचा" आणि "येथे क्लिक करा" अशा शब्दप्रयोगांचा वापर करण्यात आला आहे. त्याचबरोबर या संकेतस्थळावरील विविध दुव्यांवर क्लिक केल्यानंतर संबंधित संकेतस्थळ नव्या चौकटीत दिसू लागेल आणि तत्पूर्वी, आमच्या संकेतस्थळावर त्याबाबतचा संक्षिप्त संदेश प्रदर्शित केला जाईल.
 • तक्त्याचे शीर्षलेख : शीर्षक आणि उपशीर्षकाचा वापर करून प्रत्येक पृष्ठावरच्या मजकुराची रचना करण्यात आली आहे. वापरकर्त्यांची सोय लक्षात घेत मजकूर, शीर्षक आणि उपशीर्षक यांच्यात सुसंगती राहिल, याची खातरजमा करण्यात आली आहे. उदा. एखाद्या तक्त्यामध्ये ५ स्तंभ आणि ३० रांगा असतील तर कोणत्या चौकटीतील माहिती कशाची आहे, हे दृष्टीहीन वापरकर्त्याला समजणे गैरसोयीचे होईल. अशा परिस्थितीत स्क्रीन रीडर सारखी सुविधा उपयुक्त ठरेल.
 • शीर्षके: या संकेतस्थळावरील पृष्ठांची रचना करताना त्यावरील मजकूर आकलन-सुलभ असावा, यासाठी समर्पक शीर्षके आणि उपशीर्षकांचा वापर करण्यात आला आहे. एच -1 मुख्य शीर्ष दर्शविते तर एच – 2 उपशीर्ष दर्शविते. या शिवाय स्क्रीन रीडरच्या वापरकर्त्यांसाठी या संकेतस्थळावर अनेक शीर्षे आहेत; स्क्रीन रीडर पर्यायाचा वापर करताना याची उपयुक्तता लक्षात येईल.
 • नावे : प्रत्येक वेब पृष्ठासाठी समर्पक नाव विनिर्दिष्ट करण्यात आले आहे, जेणेकरून वापरकर्त्याला त्या-त्या पृष्ठावर असणाऱ्या मजकुराची पूर्वकल्पना येऊ शकेल.
 • पर्यायी मजकूर : दृष्टीहीन वापरकर्त्यांसाठी प्रतिमेला पर्याय म्हणून संक्षिप्त वर्णनाची तरतूद केलेली आहे. जर तुम्ही मजकूर आधारित ब्राऊझर वापरत असाल किंवा प्रतिमा पाहण्याचा पर्याय बंद ठेवला असेल, तरीही प्रतिमेला पर्याय असणाऱ्या मजकुराच्या आधारे त्या पृष्ठावरील प्रतिमेबाबत जाणून घेता येईल.
 • एक्स्प्लीसीट फॉर्म लेबल असोसिएशन : टेक्स्ट बॉक्स, चेक बॉक्स, रेडीयो बटन आणि ड्रॉप डाऊन यादी अशा संबंधित नियंत्रकांना विशिष्ट लेबल दिले आहे. यामुळे सहायक उपकरणे आवश्यक लेबल चटकन ओळखू शकतात आणि वापरकर्त्याला आवश्यक माहिती सहज प्राप्त होऊ शकते.
 • सातत्यपूर्ण दिशादर्शक : यंत्रणा संपूर्ण संकेतस्थळावर सातत्यपूर्ण दिशादर्शक यंत्रणा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
 • कळफलक सहाय्य : कळफलकावरील टॅब आणि शिफ्ट + टॅब की वापरून संकेतस्थळावरील विविध विभाग पाहता येतील.
 • मजकूराच्या आकाराचे सानुकुलन : ब्राउझर किंवा सुगमता पर्यायांचा वापर करून वेब पृष्ठावरील मजकूराचा आकार बदलता येईल.
 • जावास्क्रीप्ट : संकेतस्थळ विकसनासाठी जावास्क्रीप्टचा वापर करण्यात आला असून कोणत्याही ब्राउझरमध्ये हे संकेतस्थळ विनासायास पाहणे शक्य आहे.

सुगमतेचे पर्याय

पटलावरील मजकूर वाचणे आपल्याला कठीण वाटते का ?

पटलावरील मजकूर स्पष्टपणे दिसू शकत नाही का ?

उत्तर "हो" असल्यास उपलब्ध मजकूर वाचता यावा, यासाठी या संकेतस्थळावर पुरवण्यात आलेल्या सुगमता पर्यायांचा वापर करा. पटलावरील मजकूर सहज वाचता यावा आणि माहिती स्पष्टपणे दिसावी, यासाठी मजकुराचा आकार आणि रंगसंगती बदलण्याची सुविधा या पर्यायांद्वारे उपलब्ध आहे.

मजकुराचा आकार बदलणे

मजकुराचा आकार प्रमाणित आकारापेक्षा लहान किंवा मोठा करता येणे शक्य आहे. मजकूर सहजपणे वाचता यावा, यासाठी तीन पर्याय प्रदान करण्यात आले आहेत. त्यांचा वापर करून मजकुराचा आकार वाढवता येईल. हे पर्याय पुढीलप्रमाणे -

 • विशाल विशाल आकारामध्ये मजकूर प्रदर्शित करतो.
 • मोठा प्रमाणित आकारापेक्षा मोठया आकारात मजकूर प्रदर्शित करतो.
 • मध्यम प्रमाणित आकारात अर्थात मूळ आकारात मजकूर प्रदर्शित करतो.

* मजकुराचा आकार बदलण्यासाठी कोणत्याही पृष्ठावर वरील बाजूस उजव्या कोपऱ्यात "मजकूर आकार" या बटणावर क्लिक करा.