Government of India

संघटनात्मक संरचना

राज्य सहकारी निवडणूक आयुक्त हे राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य पुणे या कार्यालयाचे प्रमुख आहेत. ते भारतीय प्रशासकीय सेवेतुन वरीष्ठ अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झालेले असुन त्यांनी राज्य शासनाच्या सेवेत सचिव या पदापेक्षा कमी दर्जाचे पद धारण केलेले नसावे आणि त्यांची नियुक्ती राज्यपाल करतात. त्यांचा कालावधी 3 वर्षांपर्यंत असतो आणि पुढील 2 वर्षासाठी पुर्ननियुक्ती केली जाऊ शकते. महाराष्ट्रातील सर्व (२५० व त्यापेक्षा कमी सभासद संख्या असलेल्या सहकारी गृहनिर्माण संस्था वगळून) सहकारी संस्थांच्या निवडणूकांचे अधिक्षण व प्रशासन पार पाडणेकरीता आयुक्त, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण यांना मदत करण्यासाठी खालील अधिकारी व कर्मचारी यांची पदे मंजुर करण्यात आली आहेत.

राज्य शासन प्रतिनियुक्तीवर अतिरिक्त निबंधक पदापेक्षा कमी दर्जा नसलेल्या व्यक्तीची सचिव म्हणुन नियुक्ती करते. महाराष्ट्र शासनाने खालील आकृतीबंध मंजूर केला आहे.

अ.क्र. पदनाम पदांची संख्या
1 सचिव 1
2 सह सहकारी निवडणूक आयुक्त 2
3 उप सहकारी निवडणूक आयुक्त 2
4 सहाय्यक सहकारी निवडणूक आयुक्त 6
5 विधी सल्लागार 1
7 लेखाधिकारी / रोखपाल 1
8 सांख्यिकी अधिकारी 1
9 उच्च श्रेणी लघुलेखक 2
10 सहाय्यक प्रशासकीय अधिकारी 12
11 लिपिक / टंकलेखक 12
12 शिपाई 3
  एकुण (मा. आयुक्त यांचे पद वगळून) 43