Government of India

प्रोफाईल

आयुक्त, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य, पुणे.

डॉ.जगदीश देविदासराव पाटील
शैक्षणिक अर्हता : एम.एस्सी. पी.एच.डी. (Hort.),DIT, C-DAC, PGPPM (IIMB)
ई.मेल. : sceapune@gmail.com.
दुरध्वनी क्रं. : (020) 26051177

सेवा तपशील :

स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, प्राध्यापक, राज्य शासनाचा फलोत्पादन विभाग इत्यादी सेवानंतर राज्य शासनामध्ये सनदी अधिकारी म्हणून 1985 पासून कार्यरत. उपविभागीय दंडाधिकारी, अपर जिल्हा दंडाधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी, मंत्रालय, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ इत्यादी ठिकाणी विविध पदावर काम केल्यानंतर 1998 च्या तुकडीतील भारतीय प्रशासकीय सवेतील अधिकारी म्हणून प्रवेश. संचालक, पर्यटन; मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद; महिला व बालविकास आयुक्त; जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी; व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ; महाव्यवस्थापक, बृहन्मुंबई विद्युत पुरवठा व परिवहन; सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था; विभागीय आयुक्त इत्यादी पदांवर सेवा. देशांतर्गत व कॅनडा, अमेरीका, ऑस्ट्रेलिया इत्यादी देशातील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संस्थांमधून प्रशिक्षण तसेच इंग्लंड, अमेरिका, इटली, फ्रान्स, जर्मनी, स्वित्झरलॅन्ड, कॅनडा, जपान, सिंगापूर, चीन इत्यादी देशांना भेटी. उत्कृष्ट सेवेबद्दल राष्ट्रपती पदक तसेच राज्य शासनाची प्रशंसा पत्रे प्राप्त.

दिनांक 07/08/2019 पासून आयुक्त, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, पुणे या पदावर मा. राज्यपाल महाराष्ट्र राज्य यांचे आदेश शासन राजपत्र क्रमांक 2013/प.क्रं.623/13स दिनाक 01 ऑगस्ट 2019 अन्वये नियुक्ती झाली असून त्यांनी दिनांक 7/8/2019 रोजी मध्यान्ह पूर्व पदभार स्वीकारला आहे.

सचिव, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य, पुणे.

यशवंत परशुराम गिरी,
शैक्षणिक अर्हता : बी. कॉम (Hons), जी. डी. सी. ॲण्ड ए., एच.डी.सी. एम., डी.आय.टी.
ईमेल : sceapune[at]gmail[dot]com
दुरध्वनी क्र. : (020) 26054141

सेवा तपशिल :

महाराष्ट्र शासनाच्या नागरी सेवेत सन 1996 पासुन कार्यरत आहेत. प्रादेशिक उपसंचालक (वस्त्रोद्योग); उपनिबंधक सहकारी संस्था; जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था; मा.सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था यांचे खाजगी सचिव; सह संचालक (साखर) ; सह संचालक (पणन), पुणे आणि सचिव, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण इत्यादी विविध पदांवर काम केले आहे. सह व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र सहकारी विकास मंडळ; विभागीय सह निबंधक, पुणे विभाग, पुणे आणि आयुक्त, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, पुणे या पदांचा अतिरिक्त पदभार यशस्वीरित्या संभाळला आहे.

अतिरिक्त निबंधक म्हणून पदोन्नत्ती झाल्यानंतर सचिव, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण या पदावर दि.07/04/2017 पासुन कार्यरत आहेत.