Government of India

अधिकार

रासनिप्रा कडे खालील अधिकार आहेत.

  • निवडणूक घेण्याच्या प्रयोजनार्थ, असलेल्या, राज्य शासनाच्या किंवा कोणत्याही सहकारी संस्थेच्या किंवा कोणत्याही स्थानिक संस्थेच्या कोणत्याही अधिकाऱ्याची किंवा कर्मचाऱ्याची कोणत्याही पदावर तशा पदनामासह व कर्तव्यासह नेमणूक करणे आणि अशा प्रकारे नेमणूक केलेल्या प्रत्येक अधिकाऱ्याने किंवा कर्मचाऱ्याने त्याला नेमुन दिलेली कर्तव्ये पार पाडणे त्याच्यावर बंधनकारक असेल आणि असा अधिकारी किंवा कर्मचारी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या सर्वसाधारण देखरेखीखाली किंवा नियंत्रणाखाली काम करील.
  • निवडणूक घेण्यासाठी त्यांना आवश्यक वाटत असेल अशी कोणतीही शासकीय किंवा खाजगी जागा, वाहने, सेवा किंवा इतर कोणतीही साधनसामुग्री यांची राज्य शासनाचे कोणतेही कार्यालय, स्थानिक स्वराज्य सेवा, सहकारी संस्था यांचेकडुन मागणी करणे. अशी मागणी केल्यावर, ज्यांचेकडे अशी मागणी केली असेल त्या प्राधिकाऱ्याने जागा वाहने किंवा यथास्थिती, इतर कोणतेही साधनसामुग्री यांचा ताबा, मागणी करणाऱ्या प्राधिकरणाकडे किंवा याबाबत प्राधिकरणाने प्राधिकृत केलेल्या कोणत्याही व्यक्तीकडे तात्काळ, सुपुर्द करणे बंधनकारक असेल.
  • संस्थांच्या कामकाजाचे स्वरुप किंवा वर्ग यानुसार संस्थेच्या कार्यक्षेत्रात अंमलबजावणी करावयाची आचारसंहिता विहित करणे.
  • निवडणूका सुरळीतपणे व मुक्त वातावरणात पार पाडणेसाठी, त्यावर लक्ष ठेवण्याच्या दृष्टिने, नेमणूक करण्यात येतील असे निरीक्षक व क्षेत्रीय अधिकारी यांची जसजशी आवश्यकता असेल तेव्हा व त्याप्रमाणे नेमणूक करणे.
  • निवडणूका सुरळीतपणे व मुक्त वातावरणात पार पाडणेसाठी, अधिनियम व नियमांच्या तरतुदींशी विसंगत नसतील असे विशेष व सर्वसाधारण आदेश किंवा निर्देश देणे.
  • अधिनियमाचे कलम 73 (कब) चे पोटकलम (13) नुसार संस्थांनी निवडणूक निधीत आगावू जमा करावयाची आवश्यक असलेली निवडणूक खर्चाची संबंधित अंदाजित रक्कम संस्था किंवा संस्थांचा वर्ग यांचेसाठी, वेळोवेळी, निर्धारित करण्याचे सर्वसाधारण व विशेष आदेश जारी करणे.